नागपूरमध्ये ऑटो चालकावर रॉडने हल्ला | प्रवासी बसविण्याच्या वादात हिंसाचार |

नागपूर :- नागपूरच्या रस्त्यांवर प्रवासी बसवण्याच्या वादातून दोन ऑटो चालकांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि एका चालकावर रॉडने हल्ला करण्यात आला. चला, जाणून घेऊया संपूर्ण घटना!
नागपूर शहरातील पंचशील चौक ते झाशी चौक दरम्यान सकाळच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला.55 वर्षीय महिंद्र मॅक्स वाहन चालक प्रवीण ढगे यांच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला.
प्रवासी बसवण्यावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की वाहन चालक राजेश कुहीकरने प्रवीण ढगे यांच्यावर रॉडने प्राणघातक हल्ला केला.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी प्रवीण ढगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.आरोपी राजेश कुहीकरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांनी दिली आहे.
ही घटना नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवरील प्रश्न उभा करते. प्रवासी बसवण्याच्या वादातून असा हिंसाचार होणे निश्चितच धक्कादायक आहे.पोलिस तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा.