विद्याथ्र्यांची एकरुपता अध्यापन पध्दतीसाठी आवश्यक – डॉ. नितीन काळे

अमरावती :- शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने शिक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. अध्यापन पद्धतीचे उपयोजन करावे लागते. असे प्रभावी अध्यापन कौशल्य शिक्षकांच्या विकासासाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील योगा विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीन काळे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, तर अध्यक्षस्थानी प्रा. राधिका खडके उपस्थित होते.
डॉ. नितीन काळे पुढे म्हणाले की, विद्याथ्र्यांना पाठ योजना ही अत्यंत महत्वाची आहे. पाठ म्हणजे विषय वस्तू, तसेच योजना म्हणजे प्लॅनिंग, पाठ हे प्रतिकूल आणि अनुकूल असायला पाहिजे. त्यातून ज्ञानामध्ये वृद्धी होते. योजना म्हणजे जे आपण कार्य करतो त्या कार्याची पद्धत. शिक्षक आपला विषय शिकवीत असताना पद्धत आणि विद्याथ्र्यांची बुद्धीमत्ता पाहून त्यानुरुप शिक्षणामध्ये पद्धती अवलंबली पाहिजे.
विद्याथ्र्यांना शिकविल्या नंतर त्यांना किती समजले हे सुद्धा त्यांच्या चेहयावरून शिक्षकाने जाणुन घेतले गेले पाहिजे, तरच विद्याथ्र्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. याप्रसंगी काळे यांनी ओरिएंटेशन चे महत्व, डेमोस्ट्रेशन कसे असले पाहिजे, प्रोजेक्ट व सूक्ष्म अध्यापन काय असते, हे सुद्धा विद्याथ्र्यांंना समजावून सांगितले. प्रास्ताविक प्रा. आदित्य पुंड, सूत्रसंचालन प्रा. स्वाती धनस्कर, तर आभार प्रा. भूषण परळीकर यांनी केले.