LIVE STREAM

AmravatiLatest News

जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त दुर्वांकुर रुग्णालयातर्फे जनजागृती रॅली – एकत्र व्हा, कृती करा, निर्मूलन करा!

अमरावती :- आज जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त अमरावतीच्या दुर्वांकुर रुग्णालयातर्फे नागरिकांमध्ये कुष्ठरोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.यावर्षीची थीम होती – ‘एकत्र व्हा. कृती करा. निर्मूलन करा.’पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि दुर्वांकुर रुग्णालयाचे संचालक डॉ. सतीश डहाके यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.आमच्या प्रतिनिधीकडून या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त पाहुया.

24 मार्च हा दिवस जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अमरावतीच्या दुर्वांकुर रुग्णालयातर्फे नागरिकांमध्ये कुष्ठरोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले.पोलीस भर्ती प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि नर्सिंग विद्यार्थी यांचा रॅलीत सक्रीय सहभाग होता.

राजापेठ चौक आणि राजकमल चौक येथे पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना कुष्ठरोगाची लक्षणे आणि उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली.
हातात फलक घेऊन घोषणा देत विद्यार्थ्यांनी कुष्ठरोग निर्मूलनाचा संदेश दिला.”एकत्र व्हा. कृती करा. निर्मूलन करा.” ही थीम लक्षात ठेवून नागरिकांना समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणा देण्यात आली.

या वेळी डॉ. सतीश डहाके, डॉ. शैलेश जायदे, डॉ. सचिन कोरडे आणि डॉ. स्नेहल सतीश डहाके उपस्थित होते.तसेच उमप नर्सिंग स्कूलच्या अर्चना मॅडम, प्रा. दीपक धुरंदर आणि धीरज कुमार यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी संदीप कोटांगळे, निलेश बिजवे आणि विवेक वाकोडे यांनी मोलाचे योगदान दिले. हा उपक्रम कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला आहे.

कुष्ठरोगाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि समाजातील गैरसमज दूर करणे हेच या रॅलीचे मुख्य उद्दिष्ट होते. दुर्वांकुर रुग्णालय आणि सहभागी विद्यार्थ्यांनी घेतलेला हा पुढाकार समाजाला प्रेरणादायी ठरला आहे. अशाच समाजोपयोगी उपक्रमांची माहिती तुम्हाला मिळत राहील City News वर. पाहत राहा, City News.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!