LIVE STREAM

Bollywood

‘मुंज्या’ची तिसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई, ३० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाने रविवारी कमावले तब्बल ४ कोटी .

मोना सिंग, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मुंज्या’ हा भयपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लिजेंड ऑफ मुंज्याभोवती फिरतो. भारतीय लोककथांवर आधारित हा चित्रपट आहे.

‘मुंज्या’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ४ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये ८१.२५ टक्क्यांनी वाढ झाली असून त्याने ७.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी झालेल्या कमाईचे आकडे आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या, सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता ‘मुंज्या’चे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन १९ कोटींवर पोहोचले आहे.‘मुंज्या’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. बजेटच्या निम्म्याहून जास्त कमाई या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत केली आहे. बॉक्स ऑफिसवर अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने १९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला तर एक आठवडा पूर्ण होण्याआधीच तो बजेटची रक्कम वसूल करू शकतो, असं दिसत आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!