आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार

अमरावती :- आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी कार्याची वाटचाल करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते. प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या क्षमतेप्रमाणे मेहनत करीत असतो. महाविद्यालयीन जीवनात असतांना आपल्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण व्हावेत यासाठी प्रत्येकच विद्यार्थी हा प्रयत्नरत असतो. अश्याच परिस्थितीत काही विद्याथ्र्यांना यश मिळते. त्यांच्या यशाचा गुणगौरव व्हावा, प्रेरणा मिळावी म्हणून शैक्षणिक व्यासपीठावर अश्या विद्याथ्र्यांचा सत्कार घेणे सुद्धा महत्वाचे ठरते. हीच प्रेरणा विद्याथ्र्यांमध्ये जागृत व्हावी यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत येणाया एम. ए. आजीवन अध्ययन व विस्तार या अभ्यासक्रमातील काही विद्याथ्र्यांनी उन्हाळी 2023 व उन्हाळी 2024 परीक्षेमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केल्याबद्दल आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा प्रसंगी त्यांच्या यशाचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र सरोदे, इंजी. श्री. हरिष मोहोड, विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.
विद्यापीठाच्या उन्हाळी 2023 परीक्षेमध्ये प्रथम स्थान प्राप्त करणारे डॉ. रणजित बसवनाथे, द्वितीय श्री राहुल मिश्रा, तृतीय कु. निकिता बेठे, उन्हाळी – 2024 परीक्षेमध्ये प्रथम कु. प्रतिज्ञा शेजे, द्वितीय कु. कृपाली जुमनाके, तृतीय स्थान प्राप्त करणारे श्री ओमकार बोडखे यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यामधील काही विद्यार्थी विविध एन.जी.ओ मध्ये कार्य करीत असून सामाजिक योगदान देत आहेत. अश्याच प्रकारचे प्रयत्न इतरही विद्याथ्र्यांनी करावेत आणि आपल्या यशाचा जल्लोष करावा असे आवाहन याप्रसंगी संजिता महापात्र यांनी विद्याथ्र्यांना केले. विद्याथ्र्यांना केवळ डिग्री न देता त्यांच्यामध्ये रोजगाराभिमुख कौशल्य निर्माण होण्याबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने अश्या समाजभिमुख कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे असल्याचे डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले.