Gold Rate : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याला चकाकी, पाहा तुमच्या शहरात आजचा सोन्याचा दर किती?

१ एप्रिल २०२५: नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभासोबतच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ३१ मार्चच्या तुलनेत आज सोन्याच्या दराने उच्चांक गाठला असून प्रति तोळा सोन्यात ९०० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ९२,००० रुपये प्रति तोळा तर मुंबईत ९१,९०० रुपये प्रति तोळा आहे. चांदीचा दर १,०३,९०० रुपये प्रति किलो असून त्यामध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही.
मुख्य शहरांतील सोन्याचे दर (१ एप्रिल २०२५)
दिल्ली:
२२ कॅरेट: ८४,४१० रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट: ९२,०७० रुपये प्रति १० ग्रॅम
मुंबई:
२२ कॅरेट: ८४,२६० रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट: ९१,९२० रुपये प्रति १० ग्रॅम
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार तुमच्या शहरातील दर:
मुंबई:
२२ कॅरेट: ८१,७३९ रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट: ८१,१७० रुपये प्रति १० ग्रॅम
पुणे:
२२ कॅरेट: ८१,७३९ रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट: ८१,१७० रुपये प्रति १० ग्रॅम
नागपूर:
२२ कॅरेट: ८१,७३९ रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट: ८१,१७० रुपये प्रति १० ग्रॅम
नाशिक:
२२ कॅरेट: ८१,७३९ रुपये प्रति १० ग्रॅम
२४ कॅरेट: ८१,१७० रुपये प्रति १० ग्रॅम
सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, सरकारी कर, रूपयाच्या विनिमय दरातील बदल आणि स्थानिक मागणी-पुरवठ्याच्या स्थितीमुळे भारतात सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होतात. सोन्याला गुंतवणुकीचे सुरक्षित साधन मानले जाते आणि विशेषतः लग्नसराई व सणांच्या काळात त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.