ब्रिटिशकालीन ट्रॅक्टरला म्युझियममध्ये स्थान द्या! – ऐतिहासिक कृषी वारसा दुर्लक्षित?

अमरावती, परतवाडा :- परतवाड्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्राच्या सात प्लॉट्समध्ये ब्रिटिशकालीन ट्रॅक्टर दुर्लक्षित अवस्थेत आढळून आले आहे. हे ऐतिहासिक ट्रॅक्टर दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी शेतीसाठी वापरण्यात येत होते. मात्र, आज ते जंग खाऊन पडले असून, त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
ऐतिहासिक वारसा जतन होणार का?
हा ट्रॅक्टर केवळ एक यंत्र नसून, तो शेतीच्या ऐतिहासिक परिवर्तनाचा साक्षीदार आहे. ब्रिटिश काळात शेतीसाठी कोणती तंत्रे वापरण्यात आली, याचा अभ्यास करण्यासाठी हे ट्रॅक्टर म्युझियममध्ये ठेवले पाहिजे, असे अभ्यासकांचे मत आहे.
जुन्या आणि नव्या शेती तंत्रज्ञानाची तुलना गरजेची
आज आधुनिक यंत्रसामग्रीने शेती प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. अशा वेळी जुनी शेती यंत्रे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची तुलना करून संशोधन करणे आवश्यक आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील प्रगतीला चालना मिळू शकते.
प्रशासन कोणती भूमिका घेणार?
परतवाड्यातील कृषी संशोधन क्षेत्राला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे ट्रॅक्टर संग्रहालयात ठेवून भविष्यातील संशोधनासाठी उपयोगात आणावे, अशी मागणी नागरिक व अभ्यासक करत आहेत. यावर प्रशासन कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ट्रॅक्टर म्युझियममध्ये ठेवावे का? तुमचे मत?
हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी नागरिक, इतिहासप्रेमी आणि संशोधकांनी सरकारकडे मागणी केली आहे. तुमचे यावर काय मत आहे? आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अपडेट राहा फक्त सिटी न्यूजसोबत!