आधार_कार्ड अपडेट करून देण्याच्या बहाण्याने बापाने २ मुलींना ढकलले नदीत
#आधार_कार्ड अपडेट करून देण्याच्या बहाण्याने बापाने २ मुलींना ढकलले नदीत
#अकोला जिल्ह्यातील घटना
#बाळापूर येथील #भिकुंड नदीत घटनेने गावात उडाली खळबळ
पोलिसांची शोधमोहीम सुरूच, वडिलाने दिली कबुली
आधी मुलीना नदीत ढकलले नंतर मुली हरविल्याची पोलिसात दिली तक्रार
बुलढाणा जिल्ह्यात राहणाऱ्या क्रूर स्वभावाच्या बापाने आपल्या दोन मुलींना दुचाकीने नेऊन थेट वाहत्या नदीत ढकलून दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील भिकुंड नदीत घडली ,, आधार कार्ड अपडेट करून देण्याच्या बहाण्याने बापाने २ मुलींना दुचाकीने घेऊन गेला ,, मुलींना आधी नदीत ढकलले नंतर पोलीस स्टेशन गाठून दोन्ही मुली हरविल्याची बनावट तक्रार दाखल केली ,, मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने वेगळ्या दिशेने तपास करून सत्यता समोर आली ,, आता त्या दोन मुलीचा नदीत शोध कामाला पोलीसांनी सुरुवात केली तर इकडे क्रूर स्वभावाच्या बापाला हातकडी ठोकली..