नागपूरमध्ये अभियंता महिलेची आत्महत्या! ‘माझे खोटे व्हिडिओ बनवले जात आहेत’ – सुसाईड नोटमधून उलगडली मानसिक छळाची शोकांतिका
नागपूर: नागपूर शहरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका हुशार महिला अभियंत्याने आत्महत्या केली असून, तिच्या खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटमधून मानसिक छळ आणि सायबर गुन्हेगारीचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
‘ती मी नाही… माझे खोटे व्हिडिओ बनवले जात आहेत’ – शेवटची विनंती
ही आत्महत्या नव्हे, तर मन:स्वास्थ्य आणि समाजाच्या संवेदनशीलतेवर उठलेलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. मृतक महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की –
“माझे काही लोक खोटे व्हिडिओ बनवून मला फसवीत आहे… ती मी नाही… प्लीज मदत करा…” या पत्रात मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये, तिच्या व्यथित मन:स्थितीचे स्पष्ट संकेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ही महिला काही दिवसांपूर्वी पुण्यात मिसिंग झाली होती आणि सध्या ती नागपूरमध्ये राहत होती.
घरात गळफास लावून जीवन संपवलं
नागपूर शहरातील तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आत्महत्या नव्हे, तर मानसिक छळाचा गंभीर प्रकार असल्याचा प्राथमिक संशय आहे.
गुन्हा दाखल – सायबर गुन्हेगारीचा तपास सुरू
मृतक महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर पोलीस आयुक्त राहुल मदणे यांनी सिटी न्यूजला सांगितले की,
“या प्रकरणाचा सायबर गुन्हेगारी आणि मानसिक छळाच्या दृष्टीने तपास सुरू असून, आम्ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेत आहोत.” समाजमन हादरवणारी आत्महत्या – न्यायासाठी लढा आवश्यक या घटनेमुळे संपूर्ण नागपूर हादरले असून, समाजात सायबर शोषण, मानसिक त्रास आणि महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना फक्त कायद्याच्या चौकटीत पाहण्याची नाही, तर प्रत्येक नागरिकाने अंतर्मुख होण्याची वेळ आहे.