अमरावतीत गांजाची मोठी तस्करी उघड – ५ जण ताब्यात, १३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
अमरावती : अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने गांजाची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. नांदगाव पेठ टोलनाका ते वाळकी गावाच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनावर संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करत नाकाबंदी केली. MH 48 A 4900 क्रमांकाच्या वाहनात दोन पुरुष आणि तीन महिला अवैधरित्या गांजा वाहून नेत होते. वाहन अडवून पोलिसांनी वाहनातील सय्यद राशिद सय्यद जमशेद (वय 35), अरफाक दानिश शब्बीर पटेल (वय 23) आणि तीन महिलांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता 40.35 किलो वजनाचा गांजा, अंदाजे आठ लाख सहा हजार सहाशे रुपयांचा, दोन मोबाईल फोन (किंमत ₹20,000), एक चारचाकी वाहन (किंमत ₹5,00,000) आणि ₹23,500 रोख रक्कम असा एकूण ₹13,52,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, PSI संजय वानखडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
ताब्यात घेतलेल्या संशयितांविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात NDPS Act कलम 20, 22, 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अशी गांजाच्या तस्करीसारखी प्रकरणं उघडकीस येणं ही चिंतेची बाब असून पोलिसांनी सजग राहून मोठी टोळी उध्वस्त केली आहे.