नागपूरमध्ये करोडोंची जमीन फसवणूक उघड! काळबांडे परिवारावर गंभीर गुन्हे दाखल
नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक जमीन फसवणूक प्रकरण समोर आलं असून, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला तब्बल २१ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणात काळबांडे परिवारातील ११ जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फसवणुकीचा हा प्रकार शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्यात नोंद झाला असून, यामध्ये खोट्या कागदपत्रांचा वापर, बनावट करारनामे आणि धमक्या यांचा समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
वर्ष २०२२ मध्ये, बांधकाम व्यावसायिक किशोर रामदास वंजारी यांना मौजा शंकरपूर येथील खसरा क्र. ३४, ३५ आणि ३६ ही जमीन विक्रीस असल्याचं सांगण्यात आलं.
एकूण व्यवहार १ कोटी ११ लाखांचा ठरला होता. त्यावर ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर करारनामा करण्यात आला.
वंजारी यांनी त्यानुसार रोख आणि चेक स्वरूपात २१ लाख रुपये अदा केले.
मात्र, नंतर समोर आलं की, जमिनीचे सर्व कागदपत्रे बनावट आहेत. काही जमिनी तर आधीच विकल्या गेलेल्या होत्या.
जेव्हा वंजारी यांनी पैसे परत मागितले, तेव्हा आरोपी क्र. ५ प्रल्हाद काळबांडे याने धमकी दिली – “तुला जे करायचंय ते कर, जास्त करशील तर तू दिसणार नाही!”
पोलिसांचं नागरिकांना आवाहन
“जर कोणाचाही काळबांडे परिवाराशी जमीन व्यवहार झाला असेल आणि फसवणूक झाली असेल, तर त्वरित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.” – बेलतरोडी पोलिसांकडून अधिकृत अपील