नागपूरमध्ये दुर्दैवी घटना – २ वर्षाच्या चिमुकलीचा गेटच्या धक्क्याने मृत्यू
नागपूर: नागपूर शहरात एका दुर्दैवी अपघातात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. घराजवळ खेळताना लोखंडी गेटच्या जोरदार धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीला वाचवण्यात अपयश आलं.
कुठे घडलं हे?
ही दुर्दैवी घटना श्यामनगर, कुंजीलाल पेठ परिसरातील असून, मृत बालिका कु. आर्या शिवकुमार सेन (वय २ वर्ष) हिची ओळख पटली आहे.
काय घडलं नेमकं?
घटना ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता घडली. आर्या घराच्या लोखंडी गेटजवळ खेळत असताना, फिर्यादीचे साळीचा मुलगा आदर्श (वय १० वर्ष) गेट बंद करत होता. अचानक गेटच्या रेलिंगचा जोरदार धक्का आर्याच्या डोक्याला बसला. ती जागीच बेशुद्ध झाली. पालकांनी तिला तातडीने नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:३० वाजता, डॉक्टरांनी आर्याला मृत घोषित केलं.
पोलीस काय म्हणतात?
या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद अजनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.