LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

Shirdi News : शिर्डीत भिकाऱ्यांची धरपकड, एक म्हणाला मी तर ISRO चा अधिकारी, पोलीसही चक्रावले, नेमकं काय घडलं?

शिर्डी: शिर्डीत नुकत्याच झालेल्या भिकारी धरपकड मोहिमेत 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले होते. यापैकी काही भिकारी इंग्रजीत भीक मागत असल्याचे आढळले. विशेष म्हणजे एका भिकाऱ्याने स्वतःला इस्त्रोचा (ISRO) माजी अधिकारी असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीसही चक्रावले होते. दरम्यान या व्यक्तीस ताब्यात घेऊन नंतर त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र यामुळे शिर्डीत जोरदार चर्चा रंगली आहे.

या कारवाईत ताब्यात घेतलेला के. एस. नारायण नावाचा व्यक्ती केरळचा रहिवासी असल्याचे समोर आले. शिर्डी पोलीस, नगरपरिषद आणि साई संस्थान यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात आली. नारायण यांच्या दाव्यानंतर पोलिसांनी त्यांची माहिती खरी की खोटी हे तपासण्यास सुरुवात केली आहे.

नेमका काय म्हणाला ‘तो’ व्यक्ती?
यावेळी के. एस. नारायण म्हणाले की, मी एम. कॉम. पर्यंत शिकलो आहे. इस्त्रोमध्ये नोकरी करत होतो. आता निवृत्त झालो आहे. माझा मुलगा युकेमध्ये शिक्षण घेतो. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी मी शिर्डीला येतो. यावेळी नाशिकमध्ये माझी बॅग चोरीला गेली, त्यात आधारकार्ड, आयकार्ड आणि पैसे होते. म्हणून भाविकांकडून पैसे मागत होतो. आज संध्याकाळी मी सिंकदराबादला जाणार होतो. मी पीएसएलव्ही, जीएसएव्ही आणि चांद्रयान मोहिमांदरम्यान इस्त्रोमध्ये होतो. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक ए. राजराजन माझे मित्र आहेत. पोलिसांनी त्याला इतर भिकाऱ्यांपासून वेगळं ठेवले असून त्यांचे स्टेट बँकेचे खाते आणि इतर माहिती तपासली जात आहे. शिर्डी पोलीस नारायण यांच्या दाव्यांची पडताळणी करत आहेत. ते शिर्डीत कसे आले आणि त्यांचे म्हणणे कितपत खरे आहे, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या व्यक्तीस ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!