घरफोडीचा मोठा उलगडा | नागपूर गुन्हे शाखेची धडक कारवाई

नागपूर : लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत घडलेली घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, युनिट 3 गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घरफोडीप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 238/25, कलम 305(a), 334(1) भादंवि अंतर्गत गुन्ह्याचा युनिट 3 गुन्हे शाखेने यशस्वी तपास करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा उघडकीस आणण्यात आलेले आरोपी खालीलप्रमाणे आहेत: कुणाल सुखदेव कुकडे, वय 19 वर्ष, प्रजापती नगर, नागपूर दोन विधी संघर्षग्रस्त बालक तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक अद्यापही फरार आहे. गुन्ह्यात वापरलेले Activa वाहन (MH49AV9931) ज्याची किंमत सुमारे ₹70,000 असून, चोरीस गेलेले विविध साहित्य – कपडे, चप्पल, घडी, परफ्युम आदी मिळून एकूण ₹34,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे ₹1,04,000/- एवढी आहे. संपूर्ण कारवाईनंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून, मुद्देमालासह सर्व कागदपत्र पोलीस ठाणे लकडगंज येथे सुपूर्त करण्यात आले आहेत. या आरोपींची माहिती SIMB ऐप मध्ये भरली गेली असून, पुढील तपास सुरु आहे.