शिरसगाव कसबा येथे १६ वर्षाच्या युवकावर नशेच्या धुंदीत दगडाने जीवघेणा हल्ला!
शिरसगाव कसबामध्ये अवघा १६ वर्षीय युवकावर दगडाने हल्ला होतो…नशेत असलेल्या आरोपीवर पोलिस मात्र अजूनही कारवाई करत नाहीत जखमी वडिलांचा पोलिसांवर संताप अनावर… हा कायद्याचा अधःपात नाही का?
शिरसगाव कसब्याचा रहिवासी सोमेश्वर सुनील साहतपुरे, वय १६ वर्ष, आपल्या मित्रांसोबत शेतशिवारात गेला होता. गावात परतताना अचानक गावातील एका व्यक्तीने त्याच्यावर दगड फेकून गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत सोमेश्वरला जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे दाखल करण्यात आले. त्याचे वडील सुनील सहापुरे यांनी तत्काळ शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली…पण…घटना उलटून ३-४ दिवस होत आलेत, तरी पोलिसांनी अजूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही! जखमीच्या वडिलांचा आरोप आहे की आरोपी हा नेहमी अमली पदार्थाच्या नशेत राहतो आणि गावातील लहान मुलांवर अनेकदा हल्ले करतो. आरोपीला तात्काळ अटक करा! कठोर शिक्षा द्या! अशी मागणी सुनील सहापुरे यांनी केली आहे.
एका १६ वर्षांच्या निष्पाप मुलावर झालेला हल्ला आणि प्रशासनाची दिरंगाई – हे चित्र काळजात धसका देणारं आहे. पोलीस जर असेच निष्क्रिय राहिले, तर मग सामान्य जनतेने आपली सुरक्षा कुणावर सोपवायची? स्थानिक या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करत आहे.