“परतवाडा शहरात रामनवमीचा जल्लोष! भव्य शोभायात्रा, गुलालोत्सव आणि महाप्रसाद

श्रीराम जन्मोत्सव म्हणजे परात्पर प्रभू रामचंद्रांच्या अवताराचा मंगलप्रसंग
आज परतवाडा शहरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने, पूजन, गुलालोत्सव आणि शोभायात्रांनी साजरा करण्यात आला.
रामनवमी निमित्त संपूर्ण परतवाडा रामभक्तीच्या रंगात रंगून गेला.
मंदिरांमधील पूजा, महाप्रसाद, आणि भव्य शोभायात्रा या भक्तिपूर्ण वातावरणात रामनामाने शहर दुमदुमलं.
आज रामनवमी… प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस… आणि संपूर्ण परतवाडा शहर रामभक्तीने न्हालं होतं.
शहरातील सुप्रसिद्ध श्री पंचमुखी मंदिर संस्थान येथे पहाटे चार वाजता अभिषेक पूजनाने श्रीराम जन्मोत्सवाला सुरुवात झाली.
पुत्रवत प्रेम करणाऱ्या रामभक्तांनी सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. पूजनानंतर गुलाल उधळत श्रीराम जन्माचा जल्लोष करण्यात आला आणि भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
या उत्सवानिमित्त शीतला माता मंदिर परिसरातही भक्तिभावाचं माहौल होता.
सुनील शर्मा मित्र मंडळ आणि वसई पंचमुखी मंडळाच्या वतीने येथे महाप्रसाद वितरित करण्यात आला.
तसेच, श्री संकट मोचन हनुमान मंदिर, पेन्शनपुरा येथे देखील उत्साह ओसंडून वाहत होता.
सायंकाळी सहा वाजता येथून भव्य आणि ऐतिहासिक शोभायात्रा शहरातून निघणार असून, याचे आयोजन शक्ती फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. प्रत्येक मंदिरात रामनामाचा गजर, आरतीचा गजर, आणि भक्तांच्या श्रद्धेची गूंज शहरभर घुमत होती.
परतवाड्यात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात
पंचमुखी मंदिरात पहाटेपासून पूजन, अभिषेक
गुलाल उधळत झाला श्रीराम जन्मोत्सव
शीतला माता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन
सुनील शर्मा मित्र मंडळ आणि वसई मंडळ पुढे सरसावले
संकट मोचन हनुमान मंदिरात भक्तीमय वातावरण
सायंकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन
शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून शोभायात्रा
परतवाडा शहरात रामनामाचा जयघोष
सर्वत्र भक्तीचा उत्सव, श्रद्धेचा सोहळा
“परतवाडा शहरात रामनवमीचा जल्लोष! भव्य शोभायात्रा, गुलालोत्सव आणि महाप्रसाद |
परतवाड्यात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. पंचमुखी मंदिर, शीतला माता मंदिर, संकट मोचन हनुमान मंदिर या ठिकाणी पूजन, गुलाल, महाप्रसाद व शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं.