बालकांच्या पोटावर डागण्या – अंनिसने उघड केला अघोरी अंधश्रद्धेचा चेहरा!

मेळघाट : हा 21 व्या शतकातील भारत आहे… पण मेळघाटात अजूनही जळणारे पोट, डागण्या आणि अघोरी उपचार सुरूच आहेत! विज्ञानाच्या युगातही आजारी बालकांच्या पोटांवर गरम लोखंडी सळईने डाग देण्याची अमानवी प्रथा इथं आजही जीवंत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने या भयावह वास्तवाला उजेडात आणलं आहे आणि या अंधश्रद्धेविरुद्ध एक उग्र मोहीम उभारली आहे.
17 मार्च ते 7 एप्रिल – अंधश्रद्धेविरोधात 21 दिवसांचा प्रकाशयज्ञ
अंनिसच्या या मोहिमेदरम्यान 72 गावांमध्ये 140 जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. अंगणवाड्यांपासून शाळा, आश्रमशाळा, गावांतील ढाण्या आणि आरोग्य केंद्रांपर्यंत अंधश्रद्धेविरोधात ठाम संदेश पोहोचवण्यात आला.
कार्यकर्ते नंदिनी जाधव, भगवान रणदिवे आणि श्रीकृष्ण धोटे यांनी काही गावांमध्ये रात्रीच्या अंधारात सोलर लाईट, मोबाइल फ्लॅशलाइट आणि ट्रकच्या हेडलाईटमध्येही कार्यक्रम घेऊन “अंधारात उजेड पेरला”.
शासनाचा सहभाग, पण फार उशिरा
या मोहिमेला जिल्हा परिषद अधिकारी सजीता मोहपात्रा, शिवशंकर भामसाबले, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि आदित्य पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. मात्र सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, इतकी गंभीर अंधश्रद्धा असतानाही या भागात याआधी कोणीही काम केलं नव्हतं.
कार्यकर्त्या नंदिनी जाधव म्हणतात,
आताची गरज – लोकजागृती आणि प्रशासनाचा आक्रमक सहभाग
या मोहिमेनंतर अनेक गावांमध्ये बालकांवर डाग देण्याचे प्रकार थांबवण्यात यश आलं आहे. पण ही केवळ सुरुवात आहे. अंधश्रद्धेविरोधात लढण्यासाठी सततचा संवाद, शिक्षण, आणि स्थानिक पातळीवर प्रशिक्षण यांची गरज आहे.