नागपूरच्या सदर भागात गुंडाची खंडणी! चाकू दाखवत सात लाखांची मागणी — पोलिसांकडून अटक

नागपूर: गुन्हेगार तुरुंगातून सुटतो आणि पुन्हा सुरू करतो त्याच ‘धंद्याची’ पुनरावृत्ती! नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. बांधकाम व्यावसायिकाकडे सात लाखांची खंडणी, चाकू दाखवून धमकी, किस्तीत दे असंही म्हणणारा गुंड…
नागपूर… महाराष्ट्राचं उपराजधानी आणि आता गुन्हेगारांचा अड्डा बनतेय का? रविवारी सदर पोलीस स्टेशनमध्ये एक मोठी फिर्याद नोंदवली गेली.
इंदूरच्या नवी वस्ती भागात सात माड्यांची फ्लॅट सिस्टीम उभारणाऱ्या कंत्राटदार मुंदडा यांच्याकडे एका गुंडाने सात लाख रुपयांची खंडणी मागितली. हा गुंड लकी पवनीत कौर, मागील दोन महिन्यांपूर्वीच एमपीडीए अंतर्गत तुरुंगातून सुटलेला, आणि सुटल्यावर लगेच गुन्हेगारीला सुरुवात! खंडणी एकावेळी देता येत नसेल, तर किस्तीत द्या – अशी थेट धमकीही त्याने दिली. त्याच्याकडे चाकू दाखवून कंत्राटदाराला धमकावल्याची माहिती आहे. लकीचा गुन्हेगारी इतिहास धक्कादायक आहे – जबरी चोरी, मारहाण, घरफोडी, रेल्वे स्टेशनवर कॉन्स्टेबलला मारहाण – अशा गंभीर गुन्ह्यांची त्याच्यावर नोंद आहे. स्पेशल टॅक्स च्या छत्तीसगडमधील कॉन्स्टेबलवर हल्ला करून लकी मागील दीड महिन्यांपासून GRP पोलिसांना हवा होता. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी माहिती दिली आहे.