अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांची मय थाई फेडरेशन ऑफ इंडियाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

अमरावती – अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य डॉ. मनीष शंकरराव गवई यांची मय थाई फेडरेशन ऑफ इंडियाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी सर्वानुमते फेडरेशनच्या वार्षिक सभेत निवड करण्यात आली असून मय थाई खेळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी डॉ. मनीष गवई यांनी केले.
नवी दिल्ली येथे नुकतेच संपन्न झालेल्या मय थाई फेडरेशन ऑफ इंडियाच्या वार्षिक सभेच्या अध्यक्ष स्थानी केंद्रीय सडक परिवहन राजमार्ग राज्यमंत्री श्री अजय टम्टा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक रंधावा, महासचिव श्री नरेंद्र कुमार त्यागी, भारत सरकारच्या रेल्वे बोर्डाचे सदस्य श्री आनंद सप्तर्षी, बिभीषण जाधव उपस्थित होते. वार्षिक सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी फेडरेशनच्या वार्षिक सभेत अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदी नेमणुकीबाबतचा प्रस्ताव फेडरेशनच्या महासचिवानी मांडला असता त्यांची निर्विरोध मय थाई फेडरेशन ऑफ इंडियाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी त्यांची निवड झाल्ल्याबद्दल शाल,श्रीफळ,नियुक्ती पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आपल्या निवडीबाबत सत्काराला उत्तर देताना डॉ. मनीष गवई म्हणाले कि खेळ ही चांगली शारीरिक क्रिया आहे जी तणाव आणि चिंतामुक्त करते.खेळाडूंसाठी चांगले भविष्य आणि व्यावसायिक जीवन देते. खेळ खेळाडूंना नाव, प्रसिद्धी आणि पैसे देण्याची क्षमता ठेवतो. म्हणून असे म्हणता येते की वैयक्तिक फायद्यासह व्यावसायिक फायद्यासाठी खेळ खेळले जातात.या दोन्ही मार्गांनी आपल्या मेंदूला शरीराला आणि आत्म्याला फायदा होतो. मुए थाई ही एक थाई मार्शल आर्ट आहे ज्यामध्ये विविध क्लिंचिंग तंत्रांसह उभे राहून स्ट्राइक करणे समाविष्ट आहे. हे किकबॉक्सिंगच्या इतर इंडो-चायनीज शैलींसारखेच आहे, म्हणजे,कंबोडियाचा प्रॅडल सेरे, मलेशियाचा तोमोई, म्यानमारचा लेथवेई आणि लाओसचा मुए लाओ. मुए बोरानपासून विकसित झालेला, मुए थाई हा थायलंडचा राष्ट्रीय खेळ आहे.भारतामध्ये देखील मय थाई खेळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन केले तसेच युवक कल्याणासाठी माझे आयुष्य समर्पित असून युवकच देशातील विकासाचे चित्र बदलू शकतो. देश निर्मितीमधे युवकांचा सहभाग फार महत्वपूर्ण असतो त्यामुळे युवकाना विधायक दिशा प्रदान करणे महत्वाचे आहे आणि भविष्यातील सक्षम देश निर्मिती देखील युवकांच्या माध्यमातून होते. युवा शक्ती हि देशाची सकारात्मक ऊर्जा असून या उर्जेला नवं आयाम प्रदान करणे काळाची गरज आहे अमरावतीच्या कर्मभूमीने मला अंतर्राष्ट्रीय स्तरापर्यंत पाठविले असे प्रतिपदानही त्यांनी केले. डॉ. मनीष गवई यांनी आपला हा सन्मान आपल्या आई- वडिलांना समर्पित केला असून अमरावतीकरांचे विशेष आभार देखील मानले आहे.
आपल्या निवडीसाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार श्री रामदास आठवले, केन्द्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) ना भास्कर जाधव ,केन्द्रीय राज्यमंत्री ना मुरलीधर मोहोळ, केन्द्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार डॉ अनिल बोन्डे,आमदार रवी राणा, माजी खासदार श्रीमती नवनीत राणा, माजी लेडी गव्हर्नर डॉ कमलताई गवई,अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभाताई खोडके, यांनी त्यांचे अभिनंदन केले.