निंभोरा खुर्दमध्ये अतिक्रमणावर मोठी कारवाई! विटा भट्टी व मूर्तिकार शेड हटवले
अमरावती — अमरावती जिल्ह्यातील निंभोरा खुर्द येथे आज सकाळी 8 वाजता शासकीय भूमीवरील अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. भूमापन क्रमांक उपविभाग 30 या शासकीय जागेवर विटा भट्टी आणि मूर्ती ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी शेड स्वरूपातील अतिक्रमणावर ही कारवाई झाली.
ही कार्यवाही माननीय आयुक्त, उपाध्यक्ष आणि तहसीलदार कार्यालय, अमरावती यांच्या आदेशावरून राबविण्यात आली. अतिक्रमण पथक प्रमुख श्री श्याम चावरे आणि नायब तहसीलदार श्रीमती टीना चव्हाण यांची कारवाईवेळी प्रत्यक्ष उपस्थिती होती.
अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीदरम्यान पोलिस आयुक्तालयामार्फत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. श्री शहेबान निरीक्षक आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केली.
शासनाच्या मालकीच्या जमिनीवरील विटाभट्टी आणि मूर्तिकारांचे शेड अचूकपणे हटविण्यात आले असून, संपूर्ण कारवाई संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.