आराधना शॉपिंग मॉलमध्ये ‘लाडली बहन उपहार योजना’चा भव्य मासिक लकी ड्रा संपन्न
अमरावती – बिझीलॅन्ड येथील आराधना होलसेल शॉपिंग मॉलमध्ये आयोजित ‘लाडली बहन उपहार योजना’चा मासिक लकी ड्रा मंगळवारी जल्लोषात पार पडला. 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत दर 1,000 रुपयांच्या खरेदीवर देण्यात आलेल्या कूपनांपैकी बंपर लकी ड्रा काढण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
कार्यक्रमाला सिटी न्यूज चे प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतिया व सौ. लता सोजतिया, बिझीलॅन्ड अध्यक्ष संतोष सबलानी, सकाळ वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी सुरेंद्र चापोरकर, राजाभय्या नानवानी, अॅड. अनिल आडवानी, गौरीशंकर हेडा, रोशनलाल हबलानी, सुरेश हबलानी, लक्ष्मण हबलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
लकी ड्राच्या वेळी लहान मुलांच्या हस्ते कूपन काढण्यात आल्याने सोहळ्याला वेगळाच उत्साह लाभला. विजेत्यांची नावे मान्यवरांच्या हस्ते घोषित करण्यात आली.
सन्मान आणि शुभेच्छांचा वर्षाव
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आराधना टीम आणि पुरणलाल हबलानी यांनी सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले. डॉ. चंदू सोजतिया यांनी योजनेचे कौतुक करत, हबलानी परिवाराचे अभिनंदन केले आणि योजनेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
बिझीलॅन्ड अध्यक्ष संतोष हबलानी यांनी पुरणलाल हबलानी यांचा विशेष गौरव करत, त्यांना “व्यापार क्षेत्रातील भीष्म पितामह” अशी उपाधी देऊन सन्मानित केले.