Latest NewsMaharashtra
दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट

मुंबई : भारत दौ-यावर आलेले दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांनी त्यांच्या शिष्टमंडळासमवेत आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी बॉम्बे स्टाक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (बीएसई) सुंदरारामन रामामुरथी यांनी श्री. अल मकतुम व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.