मेळघाटवासियांसाठी ‘मोत्यांची शेती’ विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाच्यावतीने तिस-याही वर्षी यशस्वी आयोजन
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, मूलजी जैठा कॉलेज (स्वायत्त), जळगाव, बी. पी. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, चाळीसगाव आणि वसंतराव नाईक कॉलेज, धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने मेळघाटवासियांसाठी सलग तिस-या वर्षी ‘मोत्यांची शेती’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. मनोज कुमार चोपडा यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार गवई, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हेमलता नांदुरकर उपस्थित होते.
मोत्यांची शेतीसाठी लागणारी माहिती डॉ. मनोजकुमार चोपडा व प्रा. हेमलता नांदुरकर यांनी दिली. तसेच ही शेती कशी करावी याबाबतचे प्रात्यक्षिकही डॉ. मनोजकुमार चोपडा यांनी करून दाखविले. यावेळी मोत्यांची शेतीसाठी लागणारे साहित्य देखील आदिवासी शेतक-यांना भेट देण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयकुमार गवई यांनी व्यवसायाभिमुख शिक्षण मेळघाटातील शेतक-यांपर्यंत पोचविण्याची गरज असल्याचे सांगून कार्यशाळा आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. तर डॉ. हेमलता नांदुरकर यांनी अशाच प्रकारे आणखी कार्यशाळा भविष्यात घेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी त्यांनी मोत्यांची शेती व स्थानिक शेती संदर्भात शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न प्राणिशास्त्र विभागाकडून करण्यात येतील असेही शेतक-यांना आ·ास्त केले. प्रास्ताविक डॉ. रमेश बहादुरे, सूत्रसंचालन डॉ. अतुल नाईकवडे यांनी, तर आभार प्रा. अभिषेक धांदे यांनी मानले.
कार्यशाळेला नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. मनोहर नारखेडे, विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या डॉ. रजनी तायडे, प्रयोगशाळा सहाय्यक श्री श्याम चहाकार आदी उपस्थित होते. मेळघाटातील कुसुमकोट खुर्द, जिलांगपाटी, चौराकुंंड, मालूरफॉरेस्ट, गोलाई, पाचडोंगरी गावातील शेतकरी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी धारणी महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मधुसुदन बेले, डॉ. रमेश बहादुरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.