पुण्यात बलात्कार करुन तरुणीची हत्या; मृतदेह भिमानदी पात्रात फेकला; महाराष्ट्रात खळबळ

Pune Crime News : पुन्हा एकदा महाराष्ट्राला हदरवणारी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यात अत्यंत भयानक घटना घडली आहे. बलात्कार करुन तरुणीची हत्या करण्यात आली. यानंतर तिचा मृतदेह भिमानदी पात्रात फेकला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानाकातील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
मृत तरुणी राजगुरुनगर येथुन बेपत्ता झाली होती. या तरुणीवर गावातील व्यक्तीने अत्याचार करुन खुन केल्याची कबुली दिली आहे. आरोपी हा तरुणीच्या परिचयाचा आहे. खुन केल्यानंतर मृतदेह भिमानदी पात्रात फेकुन आरोपीने क्रुरतेचा कळस केला आहे. या घटनेमुळे तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पिडित तरुणी बहिणीच्या लग्न कार्याचे सामान खरेदी आणि महाविद्यालीन क्लास साठी राजगुरुनगर येथे आली होती. यावेळी आरोपीने पिडित तरुणीला दुचाकीवरुन लिप्ट दिली. यावेळी घरी परत जाताना भिमानदी जवळील शेतात कामाचा बहाणा केला. पिडित तरुणीसोबत ओळख असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तरुणीवर अत्याचार करुन खुन केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह भिमानदीच्या पाण्यात टाकला. तरुणीची बॅग त्याने बाजुच्या विहिरीत टाकली. आरोपीला राजगुरुनगर पोलीसांनी अटक केली असुन आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
महिला अत्याचारांच्या घटनांवरुन प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल संतापल्यात. मुलींवर अत्याचाराच्या घटना वारंवार बघत आणि वाचत असते. यात अत्याचार करणारे कुटुंबातील काही व्यक्त असल्याचं अनेक वेळा समोर आले आहे. काही घटनांमध्ये तर बापच मुलींवर बलात्कार करत असल्याचं उघड झालंय.अशा बापाचा मुलीने खून करावा असा संताप अभिनेत्री अलका कुबल यांनी जळगावमधील खान्देश करिअर महोत्सवाच्या निमित्तानं बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे.