LIVE STREAM

BollywoodLatest News

अखेर गर्लफ्रेंड गौरीसोबत दिसला आमिर खान, हातत-हात धरून एकत्र…

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रैटसोबत दुसऱ्या मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवलमध्ये सहभागी झाला. या कार्यक्रमात दोघांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आमिर खान हा फोटो काढण्याआधी गौरी सोबत कसा वागतो यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सगळे त्यामुळे त्याचे कौतुकही करत आहेत. त्यानंतर दोघांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पापाराझींना पाहून स्माईल केली.

आमिर आणि गौरीचा हा व्हिडीओ आताच्या X म्हणजेच आधीच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवलमध्ये आमिर त्याची गर्लफ्रेंड गौरीसोबत आला होता. या कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहून सगळ्यांना आनंद झाला. त्यांचे या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये आमिर खान हा कार्यक्रमात पोहोचल्यानंतर फोटो काढण्यासाठी समोर येतो, तर त्यासाठी तो आधी गौरीच्या दिशेनं हात पुढे करतो. गौरी त्याचा हात पकडते. त्यानंतर पापाराझींसाठी ते पोज देताना दिसतात. त्यावेळी त्यांच्यासोबत चायनिज अभिनेता शेन टेंग आणि मा ली देखील दिसले. एका फोटोत आमिर आणि गौरी, शेन टेंग आणि मा लीसोबत कॅमेऱ्या समोर पोज देताना दिसत आहे. तर तो हसला देखील आणि कोणत्या विषयावर बोलताना दिसले. तर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आमिर खाननं काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे. त्यावर त्यानं काळ्या रंगाची शॉल घेतली आहे. गौरीनं फ्लोरल प्रिंटसी साडी नेसली आहे आणि तिनं चष्मा लावला आहे.

जीडीटुडेनुसार, आमिर खान, शेन टेंग आणि मा ली फोरमचा भाग होणार. ज्याचा विषय आहे हसणं हे सगळ्यात चांगलं औषध आहे. ते ‘कॉमेडीचे सामाजिक प्रभाव आणि भलिष्यावर क्रॉस-कल्चरल संवाद’ वर चर्चा करणार आहेत. हा कार्यक्रम 9 अप्रिल रोजी सुरु झाला होता. गेल्या महिन्यात आमिरनं तिच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं गौरी स्प्रॅटसोबत तिच्या नात्यावर शिक्का मोर्तेब केला. त्यानंतर पहिल्यांदा ते मुंबईत एकत्र दिसले होते. ते पण आमिरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते देखील कारमध्ये बसताना. आमिर सगळ्यात आधी त्याच्या बिल्डिंगमधून बाहेर आला आणि पापाराझींना पाहून हसला आणि गौरीची प्रतीक्षा करत होता आणि लवकरच कारपर्यत पोहोचला. 

दरम्यान, आमिरनं त्याची गर्लफ्रेंडला एक भेट दिली. त्या भेटी दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्यावर कमेंट करण्यात आली की तुला आता लपून तिला भेटण्याची गरज नाही. आमिरची गर्लफ्रेंड ही बंगळुरुची आहे आणि आम्ही एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतो असं त्यानं म्हटलं. पण ‘आम्ही दीड वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये आलो. ती मुंबईत होती आणि अचानक एक दिवस आम्ही भेटलो आणि मग संपर्क झाला आणि हे सगळं आपोआप झाल्याचं सांगितलं.’

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!