बडनेरा नवीवस्तीमध्ये 45 लक्ष निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भव्य लोकार्पण
अमरावती : बडनेरा नवीवस्ती येथील अशोक नगरमध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळा आणि स्मारकाचे उद्घाटन आमदार रवि राणा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. आमदार रवि राणा यांच्या ४५ लाख रुपयांच्या निधीतून साकारलेले हे स्मारक सामाजिक सलोखा आणि बौद्धिक प्रेरणेचे प्रतीक ठरत आहे.
सार्वजनिक कपिल बौद्ध विहार आणि सोशल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या लोकार्पण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रवि राणा, पु.भं. नागाअर्जुन सुराई ससाई, डॉ. प्रशांत रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकार्पण प्रसंगी आमदार रवि राणा म्हणाले, “बडनेरा मतदारसंघातील प्रत्येक अपूर्ण बुद्ध विहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा माझ्या निधीतून पूर्ण केला जाईल.”
स्मारकाची संकल्पना इंजि. विलास साखरे यांची असून, श्री. अजय जयस्वाल यांनी विशेष पुढाकार घेतला. सोहळ्याला शेकडो सामाजिक कार्यकर्ते, भिक्खू संघ, महिला, युवा मंडळ आणि ग्रामस्थांनी हजेरी लावली. कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला, ज्यामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली.