राधानगरी नवीन लेआऊटचा भव्य शुभारंभ

अमरावती : अमरावती शहराच्या विकासात आणखी एक पाऊल पडले असून, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाजवळ मौजे राजुरा परिसरात साकारलेल्या ‘राधानगरी नवीन लेआऊट’चा भव्य शुभारंभ आज १३ एप्रिल रोजी करण्यात आला. समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या संकल्पनेतून साडे आठ एकरात वसलेला हा प्रकल्प स्वस्त दरात दर्जेदार प्लॉट्स उपलब्ध करून देणारा ठरला आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठापासून केवळ अडीच किमी अंतरावर असलेला हा लेआऊट अच्युत महाराज हॉस्पिटल, कॅम्ब्रिज स्कूल आणि गोडे मेडिकल कॉलेजच्या जवळ आहे, ज्यामुळे तो आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. येथे १०००, १२०० आणि २००० स्क्वेअर फूटांचे खुले प्लॉट ४ सुलभ हप्त्यांत उपलब्ध असून, १५ महिन्यांच्या मुदतीवर फक्त २१ हजारांत बुकिंगची संधी आहे.
शुभारंभ सोहळ्यास शिवधारा आश्रमाचे संत संतोषकुमार महाराज यांच्या हस्ते फित कापून प्लॉट बुकिंगला सुरुवात झाली. यावेळी अर्चित कुमार, पवनकुमार जाजोदिया, अंशू जाजोदिया, कैलास मुन्शी यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. संत संतोषकुमार महाराजांनी आपल्या भाषणात चंद्रकुमार जाजोदिया यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
सिटी न्यूज चे प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतिया, दर्शना जैन आणि शहरातील अनेक मान्यवरांनी जाजोदिया कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. राधानगरी लेआऊटमध्ये पाण्याची थेट पाइपलाइन, सीमेंट काँक्रीट रस्ते, जॉगिंग ट्रॅक, गार्डन, मंदिर, २४ तास सुरक्षा आणि भव्य प्रवेशद्वार अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी परवडणारा आणि आधुनिक राहणीमानाचा अनुभव देणारा ठरेल.