Nagpur Crime News : नवऱ्याने हातपाय बांधले, दीराने डोक्यात रॉड घातला; नागपूरमध्ये फिजिओथेरपिस्ट महिलेचा भयानक अंत

Nagpur Crime News : राज्याच्या उपराजधानी नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या करण्यात आली आहे. डॉ. अर्चना राहुले असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नवऱ्याने हातपाय बांधले, दीराने डोक्यात रॉड घातला
पुढे आलेल्या माहितीनुसार, डॉ.अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. तर आरोपी पती डॉ. अनिल (वय 52 वर्ष) हा छत्तीसगड-रायपूर येथे वैद्याकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे. घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले, तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला असल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृतकला एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतोय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.