मनपात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

अमरावती : उत्साहात अमरावती महानगरपालिकेत साजरी करण्यात आली. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांचे शुभहस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. यावेळी उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, उपअभियंता प्रमोद इंगोले, उद्यान निरीक्षक मुकेश खारकर, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे, राजेश राठोड, विनोद निचत, प्रमोद मोहोड, विष्णू लांडे, भुषण खडेकार, ऋषिकेश चावरे, राकेश पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अभिनेता सर्जेराव गलपट यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत गीत गायन सादरीकरण केले. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक) येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास हारार्पण करण्यात आले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभुषेत सर्जेराव गलपट यावेळी उपस्थित होते.