Maharashtra Politics
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अनेक मंदिराला भेट देऊन शरयू काठी केली महाआरती.
आदित्य ठाकरे अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम इस्कॉन मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी हनुमान गढी इथं जाऊन हनुमानाचं दर्शन आणि रामलल्लाचं दर्शन घेतलं आणि पुढे शरयू नदीकाठी जाऊन महाआरती केली.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतीच शरयू नदीची महाआरती पार पडली. यावेळी ते भक्तीभावात तल्लीन झालेले पहायला मिळाले. यावेळी शरयू काठ आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं होतं. या तयारीसाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आधीच अयोध्येत पोहोचले होते.