विद्यापीठात योग शिक्षणावर कार्यशाळा संपन्न पदव्युत्तर शिक्षण विभागाचे आयोजन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण विभागाच्यावतीने नुकतीच दोन दिवसीय योग शिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी विभागाच्या डॉ. ·ोता सत्तुरवार, मार्गदर्शक म्हणून विभाग प्रमुख डॉ. प्रणव कोलते, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे योग शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सूर्यकांत पाटील उपस्थित होते.
डॉ. सूर्यकांत पाटील यांनी पहिल्या दिवशीच्या सत्रात पंतजलीचे अष्टांग योग, शुध्दीकरणाची प्रक्रिया शास्त्रशुध्द पध्दतीने समजावून सांगितली. प्राणायम म्हणजे काय? प्राणायमाचे प्रकार, मानवी जीवनात प्राणायमाचे महत्त्व याविषयी सैध्दांतिक माहिती दिली. दुसया दिवशी योग प्राणायमाचे प्रात्यक्षिक विद्याथ्र्यांकडून करवून तसेच त्यांच्याशी सुसंवाद साधून प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. ·ोता सत्तुरवार यांनी योग शिक्षणाचे महत्त्व उदाहरणाद्वारा पटवून देतांना योग शिक्षण किती आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकातून डॉ. शुभांगी बोरेकर यांनी कार्यशाळेचे महत्व विषद केले. सूत्रसंचालन अक्षय सपकाळ याने, तर आभार कु. संध्या इंगळे व कु. तृप्ती पाटील यांनी मानले. कार्यशाळेला डॉ. अनिल ढवळे, डॉ. शितल विधाते, डॉ. कविता मेशकर, प्रा. धनश्याम वाघमारे, प्रा.गौरव ठाकरे, प्रा. अमृता पांडव तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.