विद्यापीठातील बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीचे मुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व कोनशिला अनावरण
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील बहुउद्देशीय सभागृह आणि आंतरगृह क्रीडा इमारतीचे बुधवारी दि. 16 एप्रिल, 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते कुदळ मारुन व नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी अमरावती जिल्ह्राचे पालकमंत्री ना. श्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. श्री गिरीश महाजन, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, आ. रवि राणा, आ. प्रतापदादा अडसड, आ. प्रवीण तायडे, माजी आ. प्रवीण पोटे पाटील, विभागीय आयुक्त श्रीमती ·ोता सिंघल, जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री गिरीश जोशी, अधीक्षक अभियंता श्रीमती रुपा जिराफे उपस्थित होते. सर्वप्रथम कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी मुख्यमंत्री महोदय तसेच अतिथींचे संत गाडगे बाबांची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशा या बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीसाठी पी.एम. उषा योजनेंतर्गत 8 कोटी व विद्यापीठ साधारण निधीमधून 5 कोटी, अशा एकुण 13 कोटी रुपयाच्या निधीतून बांधकाम होणार आहे. या भव्यदिव्य इमारतीमध्ये तळ आणि पहिला असे दोन मजले राहणार असून 2401.07 चौ.मिटर क्षेत्रफळात बांधकाम होणार आहे. लवकरच या दोन्ही बांधकामाला सुरूवात होणार आहे.
क्रीडा संकुलात बॅडमिंटन, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, बुद्धीबळ, योग आणि मार्शल आर्ट्स यांसारख्या विविध इनडोअर क्रीडांचा समावेश करण्यात येणार आहे. खेळाडूंच्या गरजांचा विचार करून ही इमारत आधुनिक डिझाईननुसार उभारली जात आहे. यामध्ये दर्जेदार फ्लोअरिंग, योग्य प्रकाशयोजना, वायुवीजन, बदलण्याची खोली, प्रेक्षक आसन व्यवस्था तसेच दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश, आदी सुविधा उपलब्ध असतील. सदर बहुउद्देशीय सभागृह खेळांसाठीच राहणार नसून दीक्षांत समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, विद्यापीठस्तरीय समारंभ तसेच सामुदायिक उपक्रमांसाठी याचा उपयोग होणार आहे. सभागृह विद्याथ्यांकरिता एक खुले व्यासपीठ प्रदान करेल.
कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विद्या शर्मा, डॉ. मनिषा कोडापे, माजी प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, डॉ. प्रसाद वाडेगावकर, माजी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्राचार्य डॉ. ए.बी. मराठे, प्रा. दिनेश सूर्यवंशी तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता, विविध प्राधिकारिणींचे सन्माननिय सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विद्यापीठ कार्यकारी अभियंता श्री शशिकांत रोडे व त्यांच्या विभागातील सर्व कर्मचारी, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे तसेच जनसंपर्क विभागातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. संचालन व आभारप्रदर्शन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले.