अकोल्यात ट्रकला अचानक आग उरळ पोलीस स्टेशनजवळ मोठी दुर्घटना

अकोला (उरळ):
काल सायंकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनजवळ एक भीषण आग लागण्याची घटना घडली. पाण्याच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच संपूर्ण ट्रक आगीत वेढला गेला.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ट्रकच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली आणि बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला, यामुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झालं. मात्र, तोपर्यंत ट्रकमधील सर्व माल, ड्रायव्हिंग कॅबिन, टायर्स आणि संपूर्ण स्ट्रक्चर जळून खाक झालं होतं.
सध्या पोलीस आणि अग्निशमन विभाग संयुक्त चौकशी करत असून, ट्रक कुठून कुठे जात होता, मालाची किंमत किती होती, याबाबतची माहिती गोळा केली जात आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये व्हिडीओच्या रूपात कैद केली असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.