महानगरपालिकेतील संपुर्ण माहिती सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर यांनी दिली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेतील विविध विभागांना भेट दिली.

अमरावती – गुरुवार दिनांक १७ एप्रिल,२०२५ रोजी महानगरपालिकेत श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरणनगर, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली. या भेटीत अर्थशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राजश्री रायभोग, प्रा.सागर मेश्राम, प्रा.अमृता पदवाड, लघुलेखक सुनिता गुर्जर, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतील संपुर्ण माहिती सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर यांनी दिली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेतील विविध विभागांना भेट दिली.
यामध्ये महानगरपालिकेतील समाज विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, एन.यु.एल.एम.विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरसचिव विभाग, शिक्षण विभाग, अग्निशमन विभाग, अतिक्रमण विभाग, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग, स्वच्छता विभाग तसेच इतरही विभागाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. अमरावती महानगरपालिकेतील समित्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. महानगरपालिकेच्या कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये महानगरपालिकेबद्दल उत्सुकता निर्माण झालेली दिसून आली. या भेटी दरम्यान शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, सहाय्यक आयुक्त दिपीका गायकवाड, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, करण पारेख यांनी सुध्दा यावेळी माहिती दिली.
यावेळी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांची भेट घेतली. भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना कोणत्या बाबींकडे जास्त लक्ष द्यावे लागते याची माहिती असणे आवश्यक आहे. समूह चर्चा करुन प्रत्येकाने एक विषय घेवून त्या विषयी माहिती दिल्यास लवकर लक्षात राहते अशा अनेक बाबी यावेळी सांगितल्या.