LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

अल्पवयीन मुलाची हत्या करत मौलवीनं दुकानात पुरला मृतदेह; पाच वर्षांनंतर….; कसा झाला ‘दृश्यम’ स्टाईल प्रकरणाचा उलगडा?

भिवंडीतील नेहरु नगर भागातून पाच वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणासंदर्भात हादरवणारा खुलासा झाला असून, समोर आलेल्या माहितीनं सर्वांच्याच पायाखालजी समीन सरकली आहे. इथंच एका वस्तीत राहणारा शोएब रशीद शेख नावाचा 17 वर्षीय मुलगा एकाएकी गायब झाला होता. ज्यानंतर आता, थेट पाच वर्षांनंतर या प्रकरणी एका इसमावर पोलिसांनी अटकेची कारवाई करत या प्रकरणाचा छडा लावला आहे.

उत्तराखंडमधील एका मशिदीतून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, तिथं तो मौलवी म्हणून वावरत असल्याचं सांगण्यात आलं. गुलाम रब्बानी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून, ठाणे क्राईम सेलनं या प्रकरणी कारवाई करत धक्कादायक माहिती समोर आणली.

घटनाक्रम पाहून आठवेल ‘दृश्यम’ चित्रपट..
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात 2020 मध्ये शोएब नावाच्या 17 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. हा गुन्हा भिवंडीच्या भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. गुलाम रब्बानी हा भिवंडीतील एका मशिदीत हाफिज-ए-कुरआन होता आणि अजान देण्याचं काम करायचा. त्याचे एका अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध होते.

हे संबंध मृतक शोएबने पाहिले होते. ही गोष्ट उघड होईल या भीतीने आणि रागाने गुलाम रब्बानीने शोएबला दुकानात बोलावून घेतले आणि धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर शोएबचे मृतदेहाचे तुकडे केले गेले. काही अवयव कचऱ्यात फेकण्यात आले आणि उर्वरित अवशेष दुकानातच पुरून टाकण्यात आले. हा आरोपी 2020 पासून फरार होता. ठाणे

प्रॉपर्टी सेल या प्रकरणाची सतत चौकशी करत होती. अखेर ठाणे प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाने गुलाम रब्बानीला उत्तराखंड येथून अटक केली. ठाणे क्राइम ब्रँचचे DCP अमर सिंह जाधव यांनी सांगितले की, मशिदीत अजान देणारा गुलाम रब्बानी आणि एका अल्पवयीन मुलीचे अनैतिक संबंध होते. हे संबंध मृत शोएबने पाहिल्यामुळेच रब्बानीने त्याची हत्या केली.

कुटुंबीयांनी दाखल केली होती शोएब बेपत्ता असल्याची तक्रार
20 नोव्हेंबर 2020 मध्ये शोएब अचानक घरातून बेपत्ता झाला आणि ही माहिती मिळताच त्याता शोध घेण्याचा प्रयत्नही झाला. मात्र तो न सापडल्यानं 21 नोव्हेंबर 2020 ला भिवंडीतील एका पोलीस स्थानकात शोएबच्या कुटुंबानं तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी आयपीसी 346 अन्वये तक्रार नोंदवून घेत याप्रकरणी तपास सुरू केला. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रब्बानीला पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारे अटक केली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांना चकवा देत त्यानं पळ काढला. तेव्हापासून फरार असणारा हा आरोपी उत्तराखंडमधील एका मशिदीत मौलवी म्हणून वावरत होता. ज्याची माहिती मिळता पोलीस पथकानं त्याला तिथूनच ताब्यात घेतलं.

आरोपीला ताब्यात घेताच त्यानं गुन्ह्याची कबुली देत आपण शोएबची हत्या करत त्याच्या मृतदेहाचे तुकडे दुकानात पुरल्याचं सांगितलं. ज्यानंतर पोलिसांनी दुकानात खोदकाम करून तिथून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढत पुढील तपासणीसाठी ते फॉरेन्सिक लॅबला पाठवले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!