6 जानेवारी ला श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम #CITYNEWS_AMRAVATI
मराठी पत्रकार दिन अर्थात बाळशास्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त राजापेठ स्थित श्रमिक पत्रकार भवन येथे आज सकाळी 1 वाजता पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे.
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महानगरपालिका चे नवं नियुक्त आयुक्त डॉ.प्रविण आष्टिकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा प्र.उपसंचालक (माहिती) हर्षवर्धन पवार यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे, जयराम आहूजा, अॅड.दिलीप एडतकर, अनिल जाधव, शशिकांत ओहळे, विलास मराठे यांची प्रमुख उपस्थिती होते.
स्थानिक श्रमिक पत्रकार भवन येथे आज मराठी भाषा पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर आजी माजी तसेच वरिष्ठ पत्रकार यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश शेरेकर यांनी केले. तर अध्यक्षीय भाषण मनपा आयुक्त यांनी केले. सूत्रसंचालन रविंद्र लाखोडे, व आभार प्रदर्शन महेश कथालकर केलं. या कार्यक्रमाला वरिष्ठ पत्रकार अशोक जोशी, अनिल कुचे, प्रवीण शेंगोकार, वैभव बाबरेकर, मीनाक्षी कोल्हे, प्रवीण झोलेकर, आवारे, निशिकांत, प्रवीण कपिले, शैलेश धुंदी सह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.