AmravatiLatest News
अमरावतीत अतिक्रमण हटवले महानगरपालिकेची जेसीबी कारवाई

अमरावती : राजकमल चौक ते टांगा पडाव दरम्यान मुख्य रस्त्यावर, फूटपाथवर आणि नाल्यांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या लोखंडी शेड्स, खोके, आणि सिमेंट रॅम्प्सवर अमरावती महानगरपालिकेने जोरदार तोडक कारवाई केली. ही कारवाई गुरुवारी, १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होऊन रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती.
वाहतूक कोंडी व नागरी अडचणी लक्षात घेता, महापालिका आयुक्त आणि उपायुक्त (प्रशासन) यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, झोन क्रमांक २ अंतर्गत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.
- कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
सहाय्यक आयुक्त : भूषण पुसदकर - उपअभियंता : प्रमोद इंगोले
- अतिक्रमण पथक प्रमुख : योगेश कोल्हे
- निरीक्षक : अन्सार अहमद, शुभम पांडे
- पोलीस पथक आणि झोन २ चे कर्मचारी
महानगरपालिकेच्या जेसीबी मशिनद्वारे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले असून, रस्ते आणि पार्किंग क्षेत्र नागरिकांसाठी मोकळे करण्यात आले आहेत.