LIVE STREAM

India NewsLatest News

अश्लील फोटो, शारीरिक संबंध… संजय बांगर यांच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप

संजय बांगर या सिनियर क्रिकेटरचे भारतीय क्रिकेटमध्ये योगदान महत्त्वाचे आहे. आता संजय हे कमेंटेटर म्हणून काम करत आहेत. आयपीएल २०२५ मध्येही संजय बांगर कॉमेंट्री करून लोकांचे खूप मनोरंजन करत आहेत. दरम्यान, त्यांची मुलगी अनायाची एक मुलाखत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या मुलाखतीदरम्यान अनन्या बांगरने असे काही खुलासे केले जे जाणून तुम्हाला सर्वांनाच आश्चर्य वाटले. सर्वात आधी तुमच्या माहितीसाठी, अनाया आधी मुलगा होती पण तिच्या शारीरिक हालचाली लक्षात घेता तिने तिचे लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती मुलापासून मुलीत रूपांतरित झाली.

कुठे राहते अनया?

अनाया बांगर ही काही काळापासून लंडनमध्ये राहत होती. भारत सोडण्यामागचे कारण म्हणजे लिंग बदलणे आणि शिक्षण हे ही होते. आता ती काही दिवसांपूर्वी भारतात आली आहे. ती इथे येताच मीडिया हाऊसला मुलाखत देत आहे. आता एका मुलाखतीदरम्यान तिने एका माजी भारतीय क्रिकेटपटूवर गंभीर आरोप केले आहेत.

अनाया बांगरने केले गंभीर आरोप

ललितन टॉपला दिलेल्या मुलाखतीत अनाया बांगरने आरोप केला आहे की, एक माजी दिग्गज भारतीय खेळाडू तिच्याशी संबंध असल्याबद्दल बोलत असे. एवढेच नाही तर काही खेळाडू स्वतःचे अश्लील फोटोही पाठवत असत. हा खेळाडू नक्की कोण? याबद्दल नाव उघड केलेले नाही. मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, “क्रिकेटपटू मला अश्लील फोटो पाठवायचे. ते म्हणायचे, गाडीत ये, आम्हाला तुझ्यासोबत संबंध बनवायचे आहे.”

वडील संजय बांगर यांच्यावरही केले आरोप

अनायाने पुढे सांगितले की, “काही क्रिकेटपटू सर्वांसमोर मला शिवीगाळ करायचे.” याशिवाय, अनन्याने तिचे वडील संजय बांगर यांच्याबद्दलही सांगितले. ” जेव्हा मी माझे लिंग बदलले तेव्हा वडिलांनी मला सांगितले की मी क्रिकेट सोडावे कारण आता क्रिकेटमध्ये माझ्यासाठी जागा नाही.”

आताच्या प्रसिद्ध खेळाडूंसोबत खेळली आहे
मुलाखतीदरम्यान, अनाया बांगरने हे ही सांगितले की तिने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अनेक खेळाडूंसोबत खेळले आहे. मुशीर खान, सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल अशी मोठी नावे या यादीत आहे.

हे ही वाचा: आधी लाल गुलाबाच्या पुष्पगुच्छा सोबत स्टोरी टाकली अन् नंतर…युजवेंद्र चहलच्या रहस्यमय पोस्टने उडाली खळबळ

अनयाला ‘या’ गोष्टीसाठी वाटते वाईट
अनया बांगरने सांगितले की, “महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर्सना खेळण्याची परवानगी नाही, त्यांची टेस्टोस्टेरॉन पातळी सामान्य मुलींइतकीच असते.” याबद्दल अनया कळूप वाईट वाटते. अनायाला वाटते की तिला महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!