उल्हासनगरात धक्कादायक प्रकार! डीजे वेळेत बंद केल्यावर डीजे ऑपरेटरवर दगडाने हल्ला

हळदीच्या कार्यक्रमात डीजे वेळेत बंद केल्याच्या रागातून टोळक्यानं डीजे ऑपरेटरवर हल्ला करण्यात आलाय.
उल्हासनगर : बारसं, हळदीसारख्या आनंदाच्या कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवणे ही सामान्य गोष्ट झालीय. पण या डीजेच्या दणदणाटामुळे लोकांना त्रास होतो, काही ठिकाणी यामुळे कानाच्या समस्या निर्माण झाल्याच्या घटनाही समोर आल्यायत. तसेच वेळेच पालन न करुन कायदा मोडल्याचे प्रकारही वारंवार समोर येतात. असाच एक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आलाय.
हळदीच्या कार्यक्रमात डीजे वेळेत बंद केल्याच्या रागातून टोळक्यानं डीजे ऑपरेटरवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रेम राजबोईना असं या हल्ल्यात जखमी झालेल्या डीजे ऑपरेटरचं नाव आहे. कॅम्प नंबर 5 च्या कुर्ला कॅम्प परिसरात 18 एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम होता. त्याठिकाणी डीजे ऑपरेटर म्हणून प्रेम हा डीजे वाजवत होता. त्याच हळदीत साहिल म्हस्के, प्रतीक क्षेत्रे आणि चेतन घाटविसावे हे तरुण नाचत होते.
नियमानुसार रात्री 10 वाजता डीजे ऑपरेटर प्रेम याने डीजे बंद केला. यावेळेस डीजे सुरू करण्यासाठी साहिल याने हुज्जत घातली. मात्र प्रेमने त्याला नकार दिल्यानं त्याने प्रतीक आणि चेतनच्या मदतीने डीजे ऑपरेटर प्रेम राजबोईना याला बेदम मारहाण करत डोक्यात दगडाने हल्ला केला.