मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी बनवाबनवी; बनावट कागदपत्र करत लुटले चार लाख रुपये

कल्याण : कल्याण जवळील मोहन येथील खाजगी रुग्णालयाचा एक प्रताप समोर आला आहे. गणपती मल्टीस्पेशालिटी या रुग्णालय प्रशासनाने तब्बल १३ रुग्णाच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचाराची बनावट कागदपत्र तयार करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चार लाख ७५ हजार रुपये उकळले आहेत. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण जवळील मोहने आंबिवली परिसरात गणपती मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहे. या रुग्णालयात २६ मे ते १० जुलै २०२३ या कालावधीत रुग्णालयाने १३ रुग्णांवर शस्त्रक्रिया व औषध उपचार केल्याबाबतचे बनावट कागदपत्र तयार करून मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षाला सादर करत रक्कम मिळण्याबाबत प्रस्ताव दिली. त्यानुसार कार्यालयाकडून त्या संबंधीची प्रक्रिया देखील करण्यात आली.
फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकरणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर या प्रकरणी पोलिसांनी गणपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. अनुदुर्ग ढोनी, प्रदीप पाटील, ईश्वर पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी पुढील तपास करत आहे.