डिजिटल रेप म्हणजे काय? इंटरनेटशी अजिबात नाही संबंध; यात गुन्हेगाराला काय होते शिक्षा? जाणून घ्या!

गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये एअर होस्टेसवर डिजिटल बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. एअर होस्टेस व्हेंटिलेटरवर असताना टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या हैवानांनी तिच्यावर बलात्कार केला. काहीवेळाने पीडितेा शुद्धीवर आली. याप्रकरणी 14 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दीपक कुमारला अटक केली. दीपक हा बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी आहे. ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजीमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर तो मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयू तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. पण या घटनेनंतर डिजिटल बलात्कार म्हणजे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
डिजिटल बलात्कार म्हणजे काय?
डिजिटल बलात्कार हा एक गंभीर लैंगिक गुन्हा आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या गुप्तांगात त्याच्या संमतीशिवाय बोटे किंवा कोणतीही वस्तू घुसवली जाते. येथे डिजिटल शब्दाचा अर्थ इंटरनेट किंवा डिजिटल तंत्रज्ञान असा नाही. 2012 च्या निर्भया घटनेनंतर भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत या गुन्ह्याचा बलात्काराच्या श्रेणीत समावेश करण्यात आला. असे असताना आता भारताचा नवीन कायदा म्हणजेच भारतीय न्यायिक संहितेत (BNS) देखील हा एक गंभीर गुन्हा मानला गेलाय.
कायद्याबद्दल जागृती
भारतात डिजिटल बलात्कार हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. यापूर्वी आयपीसीच्या कलम 375-376 अंतर्गत दोषींना शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. या गुन्ह्यासाठी किमान 7 वर्षेांची शिक्षा होऊ शकते. जी काही प्रकरणांमध्ये 10 वर्षे किंवा जन्मठेपेपर्यंत वाढू शकते. जर पीडित अल्पवयीन असेल तर POCSO कायद्यांतर्गत शिक्षा अधिक कडक आहे. ज्यामध्ये 10 ते 20 वर्षांचा तुरुंगवास किंवा अगदी जन्मठेपेची शिक्षा देखील असू शकते. आता नवीन कायद्यानुसार हा गुन्हा बलात्काराच्या श्रेणीत ठेवण्यात आलाय. यामध्ये पीडितेच्या संमतीशिवाय असे कोणतेही कृत्य गुन्हा मानले जाते. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास आरोपीला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
समाजात जागरूकता
देशात डिजिटल बलात्काराच्या घटना वाढत आहेत. पण अनेक लोकांना या गुन्ह्याची माहिती नाही. जागरूकतेच्या अभावामुळे विशेषतः ग्रामीण भागात पीडित गप्प राहतात. या गुन्ह्याबद्दल लोकांना शिक्षित करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. अशा प्रकरणांमध्ये पीडित महिला अनेकदा पुढे येण्यास कचरतात, म्हणून समाजात जागरूकता पसरवणे खूप महत्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.