AmravatiLatest NewsWeather Report
अमरावतीत उन्हाचा कहर; तापमान 44 डिग्री सेल्सियसवर

अमरावती: रविवारी अमरावती शहर व परिसरात उन्हाचा पारा गगनाला भिडला. तापमान थेट ४४ अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
रविवारी दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यांवर स्मशान शांतता पसरली होती. अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. रस्त्यावर तुरळकच वाहने दिसून आली. लग्नसराईचे दिवस सुरू असूनही अनेक नागरिक दुपट्टा, गॉगल आणि टोपीने चेहरा झाकून सावधगिरीने बाहेर पडताना दिसले.
विदर्भात उष्णतेचा कहर
शनिवारी नागपूरमध्ये तापमान 44.7°C, अकोल्यात 44.2°C, आणि अमरावतीत जवळपास 43°C होते. रविवारी मात्र अमरावतीनेही 44°C गाठत उष्णतेचा उच्चांक गाठला.
सिटी न्यूजचा नागरिकांना सल्ला:
- दुपारच्या वेळेत अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर जाणं टाळा
- डोकं व चेहरा दुपट्टा, टोपी, गॉगलने झाका
- पाण्याचं सेवन वाढवा
- अंगावर हलके कपडे वापरा
- उन्हात शारीरिक मेहनतीची कामं टाळा
उष्णतेच्या झळा अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे.