अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याने गाठला उच्चांक दर, प्रति तोळा सोनं 1 लाखांवर, आजचा भाव जाणून घ्या

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याने उच्चांक दर गाठला आहे. आज सोन्याच्या दराने 1 लाख रुपयांचा दर गाठला आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदी 528 रुपये प्रति किलोने महागली असून 95775 रुपयांवर ट्रेड करतेय. तर सराफा बाजारात सोनं एक लाख रुपये प्रति तोळा ट्रेड करत आहे. त्यामुळं आता ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. डॉलरच्या घसरणीमुळं सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. सोन्याचे दर 2025मध्ये आत्तापर्यंत 30 टक्क्यांपर्यंत उसळले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. MCXवर सोन्याच्या जूनचा वायदा जवळपास 1560 रुपयांनी महागला आहे. त्यामुळं सोनं 98840 प्रतितोळावर व्यवहार करत आहे. सोमवारी सोन्याचे दर 3,400 डॉलरच्या पार गेली आहे. हा एक नवा उच्चांक आहे. डॉलर तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातू खरेदी केल्याने सोन्याचा वायदा 2.91 टक्क्यांनी वाढून $3,425.30 प्रति औंस झाला. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत सुमारे 30% वाढ झाली आहे आणि 2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात कर लादल्यापासून सुमारे 8% वाढ झाली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल तीन हजारांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,01,350 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 2,750 रुपयांची वाढ झाली असून 92,900 रुपयांवर प्रतितोळा सोनं पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 2,250 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 76,010 रुपयांवर पोहोचलं आहे.
काय आहेत सोन्याचे दर!
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 92,290 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,01,350 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,010 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,290 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,135 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,601 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 74,320 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81,080 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60,808 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट-92,290 रुपये
24 कॅरेट- 1,01,350 रुपये
18 कॅरेट- 76,010 रुपये