भंडाऱ्यात हिट अँड रन! लग्नावरून घरी जाताना अज्ञात वाहनाची धडक, दुचाकीवरील पती-पत्नीसह शेजाऱ्यांच्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

भंडारा : भंडाऱ्याच्या नाकाडोंगरीत मध्यरात्री हिट अँड रनची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील बोनकट्टा इथून विवाह समारंभ आटोपून एका दुचाकीवरून तिघे जण दुचाकीवरून गावाकडं परतत असतानाच भरधाव आलेल्या अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा घटनास्थळीचं दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्यासोबत असलेली शेजाऱ्यांची पाच वर्षीय चिमुकली अशा तिघांचा समावेश आहे.
ही घटना मध्यरात्री भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी ते पाथरी मार्गावर घडली आहे. विवाह समारंभ आटोपून बोनकट्टा इथून हे तिघेही दुचाकीनं चिखला मॉईल इथं जात असताना ही घटना घडली आहे. गोबरवाही पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असल्याचं चित्र आहे.
मृतकांमध्ये यांचा आहे समावेश
कैलास मरकाम (42)
परबता मरकाम (36)
यामिनी कंगाली (05)