UPSC चा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिली; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. उमेदवार युपीएससीची अधिकृत बेवसाईट upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबेने युपीएससी परीक्षेत देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. तर पुण्याचा अर्चिंत डोंगरे देशात तिसरा आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला. या वर्षी शक्ती दुबेने अव्वल स्थान पटकावलं असून तिच्या पाठोपाठ हर्षिता गोयलचा क्रमांक आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1129 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 180 पदं, भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) 55 पदं आणि भारतीय पोलिस सेवेतील (IPS) 147 पदं समाविष्ट आहेत.
याव्यतिरिक्त, केंद्रीय सेवा गट ‘अ’ मध्ये 605 आणि गट ‘ब’ सेवांमध्ये 142 पदे रिक्त आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत वेबसाइटवर गुण उपलब्ध होतील.
यूपीएससी टॉपर्सची यादी 2024-
1) शक्ती दुबे
2) हर्षिता गोयल
3) डोंगरे अर्चित पराग
4) शहा मार्गी चिराग
5) आकाश गर्ग
6) कोमल पुनिया
7) आयुषी बन्सल
8) राज कृष्ण झा
9) आदित्य विक्रम अग्रवाल
10) मयांक त्रिपाठी
11) एट्टाबोयना साई शिवानी
12) आशी शर्मा
13) हेमंत
14) अभिषेक वशिष्ठ
15) बन्ना व्यंकटेश
16) माधव अग्रवाल
17) संस्कृती त्रिवेदी
18) सौम्या मिश्रा
19) विभोर भारद्वाज
20) त्रिलोक सिंग
नागरी सेवा परीक्षा नियम 2024 च्या नियम 20 (4) आणि (5) नुसार, यूपीएससी खालीलप्रमाणे उमेदवारांची एकत्रित राखीव यादी तयार करत आहे. ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील 115, ईडब्ल्यूएस (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) 35, ओबीसी (इतर मागासवर्गीय) 59, एससी (अनुसूचित जाती) 14, एसटी (अनुसूचित जमाती) 6 आणि पीडब्ल्यूबीडी-1 (बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती) 1 असे एकूण 230 उमेदवार आहेत.
परीक्षा नियमांमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींचा योग्य विचार करून, उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार विविध सेवांमध्ये नियुक्ती केली जाईल.
–भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) साठी, 180 रिक्त पदे आहेत, ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील 73, ईडब्ल्यूएससाठी 18, ओबीसीसाठी 52, एससीसाठी 24 आणि एसटीसाठी 13 आहेत.
– भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) साठी, 55 रिक्त जागा आहेत, ज्यामध्ये सामान्यसाठी 23, ईडब्ल्यूएससाठी 5, ओबीसीसाठी 13, एससीसाठी 9 आणि एसटीसाठी 5 जागा आहेत.
– भारतीय पोलिस सेवेसाठी (IPS) एकूण 147 रिक्त जागा आहेत, ज्यामध्ये सामान्यांसाठी 60, ईडब्ल्यूएससाठी 14, ओबीसीसाठी 41, एससीसाठी 22 आणि एसटीसाठी 10 जागा आहेत.
– केंद्रीय सेवा गट ‘अ’ मध्ये 605 रिक्त जागा आहेत: सामान्यसाठी 244, ईडब्ल्यूएससाठी 57, ओबीसीसाठी 168, एससीसाठी 90 आणि एसटीसाठी 46.
– गट ‘ब’ सेवांमध्ये 142 रिक्त जागा आहेत: सामान्यसाठी 55, EWS साठी 15, OBC साठी 44, SC साठी 15 आणि ST साठी 13.
सर्व सेवांमध्ये एकूण 1129 रिक्त जागा आहेत, ज्यामध्ये 50 रिक्त जागा पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी राखीव आहेत (पीडब्ल्यूबीडी-1 साठी 12, पीडब्ल्यूबीडी-2 साठी 8, पीडब्ल्यूबीडी-3 साठी 16 आणि पीडब्ल्यूबीडी-5 साठी 14). शिफारस केलेल्या 241 उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती ठेवण्यात आली आहे. एका उमेदवाराची यूपीएससी सीएसई राखून ठेवण्यात आली आहे.