LIVE STREAM

Latest NewsYavatmal

यवतमाळमध्ये शनी मंदिर परिसरात क्रुझर गाडीला भीषण आग

यवतमाळ : शहरातील शनी मंदिर परिसरात आज दुपारी 12:30 वाजता एक क्रुझर गाडीने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. गाडीमधून धूर निघताना पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच गाडीने पूर्णपणे पेट घेतल्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाली.

आर्थिक नुकसान, जीवितहानी टळली:
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनधारकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. जळालेली गाडी पूर्णपणे वापरात अयोग्य झाली आहे.

उष्णतेचा संशय, तपास सुरू:
सध्या सुरू असलेल्या तिव्र उन्हाच्या लाटेमुळे गाडी गरम होऊन आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस व अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली असून, तपास सुरू आहे.

नागरिकांमध्ये भीती, प्रशासनाचे आवाहन:
घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उष्णतेच्या तीव्रतेमुळे वाहनधारकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. बंद वाहनांमध्ये जास्त वेळ थांबू नये, वाहनांचे तापमान नियंत्रित ठेवावे, असा सल्लाही देण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!