LIVE STREAM

AmravatiLatest NewsLocal News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शासनाचा आदिवासी अध्यासन केंद्र स्थापनेचा निर्णय

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा महाराष्ट्र शासनाने नुकताच निर्णय घेऊन याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रात आदिवासी बहुल क्षेत्र मोठ¬ा प्रमाणावर आहे. या परिक्षेत्रातील आदिवासी समुदायांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, उच्च शिक्षणाच्या संधीचा लाभ मिळावा, आदिवासी विद्याथ्र्यांसाठी स्वतंत्र सुविधा व त्याव्दारे आदिवासी विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरिता कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी विद्यापीठामध्ये आदिवासी अध्यासन केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून या केंद्रास शासनाने मंजुरी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आदिवासी शिष्टमंडळाने भेटून अभिनंदन केले.
महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियात नमूद केलेल्या उद्दिष्टांव्यतिरिक्त मानववंशशास्त्र अभ्यास माडिया, गोंडी, बैगा, कोलम इ. आदिवासी भाषा, संस्कृती व जीवनशैली जतन, आदिवासी ज्ञान, कला, संस्कृती, परंपरा, रितिरिवाज, उपजिविका अभ्यास आणि आर्थिक सक्षमीकरण जसे, पर्यावरणीय पर्यटन, वन पर्यटन, जलमार्ग व्यवस्थापन, जंगलांशी संबंधित धातूशास्त्र, कापड आणि त्याचे उत्पादन तंत्रज्ञान, औषधी वनस्पतींचा अभ्यास, खनिजशास्त्र, आदिवासी विद्याथ्र्यांचे उच्च व तंत्र शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था करणे आणि त्याव्दारे त्यांना रोजगारक्षम बनविणे, याकरिता हे अध्यासन केंद्र स्थापन करण्यामागील उद्दिष्टे आहेत. या उद्दिष्टांबाबत अभ्यास व संशोधन या स्थापन होणा-या अध्यासन केंद्रात होणार आहे.
शासनाच्या विविध विभागांकडून राबविल्या जाणा-या आदिवासी विकासासाठीच्या योजना व कार्यक्रमाचे मूल्यमापन, मूल्यांकन तसेच त्यासंबंधी धोरणात्मक शिफारसी करण्याची कार्यवाही संंबंधित विभागाला या अध्यासन केंद्रामार्फत करावी लागणार आहे. या केंद्रासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई, जळगांव, नांदेड, अमरावती, गडचिरोली या विद्यापीठांचे कुलगुरू सदस्य असलेली समन्वय समिती गठित केली असून सदस्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण संचालक असतील.
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठाला शासनाने आदिवासी अध्यासन केंद्र मंजूर केल्याबद्दल औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावतीचे माजी प्राचार्य श्री पुरुषोत्तम कुमरे, विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या डॉ. मनिषा कोडापे, प्र-कुलगुरुंचे स्वीय सहाय्यक श्री विठ्ठल मरापे, अभियंता श्री आकाश सोळंके, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावतीचे माजी अधीक्षक श्री भारत किनाके, विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्राच्या कु. ज्योती गेडाम, महाविद्यालयीन विभागाच्या सौ. माधुरी सोळंके, परीक्षा विभागातील श्री निकेश भोसले यांनी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!