LIVE STREAM

Marathi Bulletin

समताधिष्टीत मूल्ये,स्त्री-पुरुष समानता जपण्यासाठी आपण सदैव तत्पर व कटिबद्ध आहोत-आमदार सौ.सुलभाताई खोडके

‘ पर्यावरणपूरक विकास ‘ आणि पर्यावरण आरोग्यवर्धक असायला हवे, यासाठी सदैव प्रयत्नशील-आमदार सौ.सुलभाताई खोडके
पदमसौरभ कॉलोनी-सोनल कॉलोनी-प्रिया टाऊनशिप येथे आशिर्वाद यात्रेदरम्यान आमदार-सौ.सुलभाताई खोडकेंचे नागरिकांना मतदानाचे आवाहन
पुंडलिकबाबा नगर -राममोहन नगर येथील आशिर्वाद पदयात्रेत नागरिकांचा सक्रिय सहभाग
धोरणात ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीने आमदार-सौ.सुलभाताई खोडकेंनी केले नागरिकांच्या सूचनांचे संकलन

 अमरावती  – जनतेनी वेळोवेळी केलेले सहकार्य,दिलेली अखंडितपणे साथ,आपुलकी-जिव्हाळा याबद्दल आभारी असण्याचे दुसरे नाव कृतज्ञता आहे.ही सकारात्मक आणि सर्जनशील शक्ती आपणाला क्षणोक्षणी प्रेरणादायी व उर्जादायी ठरली आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न,कामगारांचे हक्क,महिला सशक्तीकरण यावर लक्ष केंद्रित करून सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत राहू.निवडणूक हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. जनतेने मतदानाच्या प्रक्रियेबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. नागरिकांना सुलभ,सुरक्षित आणि विस्तारित सुविधा मिळाल्या पाहिजे.याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे.अमरावती शहरात पायाभूत सुविधांची उपलब्धी तरुणांना रोजगार व स्वावलंबन मिळावे म्हणून उद्योग निर्मितीचा आग्रह धरून सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम आपण शासनदरबारी आवाज उठवला आहे.आव्हानात्मक काम करताना संयम बाळगीत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा इंजिनिअरिंग आणि क्लाउड टेक्नॉलॉजीमधील कौशल्याची मागणी लक्षात घेता आयटी आणि सेवा क्षेत्रात स्थानिक युवक-युवतींना संधी उपलब्ध व्हावी याकरिता आपण विधिमंडळात सभागृहात मागणीही केली.आपण धावत्या जगात आणि स्पर्धेच्या युगात वावरत आहोत याची सतत जाणीव ठेवून मार्गक्रमण करीत असताना शब्दांची सहानुभूती कामाची नसून कृतीतून सत्यता दिसून आली पाहिजे.यावर सातत्याने भर दिला आहे.जनआशीर्वाद पदयात्रेच्या निमित्ताने नागरिकांशी संपर्क व संवाद साधून कल्पनाशक्तीला वाव मिळतो, सर्जनशीलतेत वाढ होते.’संवैधानिक भारत घडविणे हेच आपले ध्येय व उद्दिष्ट असले पाहिजे. याकरिता प्रत्येक नागरिकांनी आगामी २० नोव्हेंबर २०२४ रोजी आवर्जून आपल्या मतदानाचा हक्क बजावीत मला जनसेवेची संधी द्यावी.अशी विनंती करत आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी पुंडलिकबाबा नगर-राममोहन नगर येथील नागरिकांना विनम्रतापूर्वक आवाहन केले. समताधिष्ठित मूल्ये,स्त्री-पुरुष समानता जपण्यासाठी आपण सदैव तत्पर व कटिबद्ध आहोत.या शब्दात आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी संवाद साधून यावेळी पदमसौरभ कॉलोनी-प्रिया टाऊनशिप येथर जनता-जनार्धनाचे आशिर्वाद घेतले.माणसाच्या आधुनिक प्रगतीसाठी व सुखसोयीसाठी विकास होणे आवश्यक असले तरी हा विकास ‘ पर्यावरणपूरक विकास ‘आणि पर्यावरण आरोग्यवर्धक असायला हवा याची काळजी घेणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता, शहरातील विविध भागात उद्याने विकसित करणे यावर आपला भर आहे.अशी भूमिका व्यक्त करीत आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांनी यावेळी गृहभेटीतून स्थानिकांशी संवाद साधला.जनतेनी वेळोवेळी दिलेली भरभक्कम साथ तसेच आपुलकीचे बळावर आपण विकासकामांना गती देऊ शकलो.आगामी काळात विविध प्रकारच्या विकासकामांची पूर्तता करण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर -२०२४ रोजी जनतेनी आपला बहुमुल्य आशिर्वाद देऊन मला मतदान करावे, या आशिर्वाद पदयात्रे दरम्यान आमदार- सौ.सुलभाताई खोडकेंनी स्थानिकांना विनंती केली.शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि शाश्वत स्वच्छतेवर आपला भर आहे.यादरम्यान आमदार-सौ.सुलभाताई खोडके यांचेशी प्रत्येक साधकबाधक आवश्यकतेवर सखोल विचारविनिमय व चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेला शब्द सार्थ ठरवीत समस्या मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न व अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेला पुढाकार लक्षात घेता आम्ही सदैव आपणासोबतच आहोत.यावेळी असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला. या आशीर्वाद पदयात्रेत पुंडलिकबाबा नगर,एकविरा विद्युत कॉलनी,विद्युत तांत्रिक कॉलनी,सुरभि विहार,गोपी कॉलोनी,के.पी.कॉलनी,राममोहन नगर,अयोध्या कॉलोनी,पटवारी कॉलोनी,तिरुमला कॉलोनी,स्नेहा कॉलोनी,प्रिया टाऊनशिप,पूर्वा टाऊनशिप,पदमसौरभ कॉलोनी,संमती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!