अनुज चौधरी याची 7 वी खेलो इंडिया बिहार करिता महाराष्ट्र कबड्डी संघात निवड

चांदुर बाजार — बिहार येथे होणाऱ्या 7 व्या खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील अनुज कमल चौधरी या युवा कबड्डीपटूची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाल्याने चांदुर बाजारसह संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण आहे.
ही निवड 21 व 22 एप्रिल 2025 रोजी पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये पार पडलेल्या चाचणीदरम्यान झाली. महाराष्ट्रातील 70 खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या चाचणीतून केवळ 12 खेळाडूंना अंतिम संघात स्थान मिळाले, ज्यामध्ये विदर्भातून दोन खेळाडूंची निवड झाली – अनुज चौधरी (चांदुर बाजार, अमरावती) व विश्वास निंभोरकर (बुलढाणा).
या निवडीमागे श्री हनुमान क्रीडा मंडळ चांदुर बाजार आणि चांदुर बाजार कबड्डी मंडळाचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन विदर्भाचे अध्यक्ष जितेंद्रजी ठाकूर व सहसचिव सतीशराव डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश साध्य झाले. या निवड प्रक्रियेसाठी श्री सतीश डफळे यांची निवड समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
तसेच श्री हनुमान क्रीडा मंडळ, गो सी टोम्पे महाविद्यालय, जीवन आधार सामाजिक संस्था, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना इत्यादींचा समावेश आहे.
या ऐतिहासिक यशासाठी अनुज चौधरी यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!