चांदूर बाजार बस स्थानक येथे स्व.दिलीपसिंह ठाकूर यांच्या स्मृतिपित्यर्थ दै.युवाधर्म पाणपोई चे उद्घाटन

मा. आमदार प्रवीणजी तायडे यांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले
चांदूर बाजार : चांदूर बाजार बस स्थानक येथे दै. युवाधर्म पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. जल ही जिवन है, जल है तो कल है ! गोर गरीबांचे पाण्यावाचून होत असलेले हाल लक्षात घेता .तसेच तालुक्याच्या ठिकानी ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांना थंडपाणी पाजून तहान शमवण्याचे काम आम्ही गेल्या 15 वर्षापासून अविरत चालू ठेवलेले आहे. याही वर्षी दि.21 एप्रिल रोजी पाणपोई चे उद्घाटन करून जनतेच्या सेवेत सुरू झालेली आहे.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार प्रवीणजी तायडे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच उद्घाटन समारोहात चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे API श्री पांडे साहेब,PSI श्री इंगळे साहेब, आगार व्यवस्थापक प्रवीणजी डायलकर , समाजसेवक मनोजभाऊ कटारिया, सुरजसिंह बैस राजपूत करणी सेना जिल्हा उपाध्यक्ष, युवाधर्म संपादक तिलक ठाकूर,मुरलीभाऊ माकोडे , रमेशभाऊ तायवाडे तालुकाध्यक्ष भा.ज.पा. ,माजी उपाध्यक्ष अतुलभाऊ रघुवंशी, शहराध्यक्ष टिकूभाऊ अहिर भा.ज.पा., तालुका अध्यक्ष ओ.बी.सी.रावसाहेब घुलक्षे, युवा स्वाभिमान तालुकाध्यक्ष पवनभाऊ बैस, निलेश देशमुख जिल्हासचिव ओ.बी.सी. मोर्चा अम, सुभाषभाऊ हरकुट, ऑटो युनियन अध्यक्ष मोंटू खान, शिवसेना शहराध्यक्ष शुभमभाऊ सपाटे, पत्रकार सागरभाऊ सावळे, पत्रकार करणभाऊ खंडारे, पत्रकार गजाननभाऊ ढवळे, संतोष अहिर,श्याम विधाते, अमन सोळंके, बाबू ठाकूर, शुभम ठाकूर, संतोष विधाते, विजू कुऱ्हेकर, लोकनाथ वानखडे, सचिन वांगे प्रामुख्याने उपस्थित होते.